8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगावर चर्चा करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यवाठीत कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) आणि नेशनल कौन्सिल JCM यांच्या स्टँडिंग कमिटीची बैठक होणार आहे.
सदरील बैठकीत पगार स्केल विलीनीकरण,किमान पगार ३६ हजार रुपये आणि फिटमेंट फॅक्टर २.६ ते २.८६ असावा अशा शिफारशींवर चर्चा होणार आहे. तसेच, महागाई भत्ता आणि DR (पेन्शनधारकांसाठी महागाई आराम) यांना मूळ पगारात समाविष्ट करण्याची आणि विलंब झाल्यास बकाया भरल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
8th Pay Commission Update
- तारीख : १० फेब्रुवारी २०२५
- ठिकाण : नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
- सहभागी : DoPT चे उपसचिव परवीन जरगर आणि JCM स्टँडिंग कमिटीचे सदस्य
- १) पगार स्केल विलीनीकरण : लेवल-१ ला लेवल-२ सोबत, लेवल-३ ला लेवल-४ सोबत आणि लेवल-५ ला लेवल-६ सोबत विलीन करण्याची शिफारशी.
२) किमान पगार : कर्मचाऱ्यांचा किमान पगार ३६ हजार असावा.फिटमेंट फॅक्टर २.० पेक्षा कमी नसावा.फिटमेंट फॅक्टर २.६ ते २.८६ दरम्यान ठेवल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात २५% ते ३०% वाढ होऊ शकते.
३) DA आणि DR चे मूळ पगारात विलीनीकरण : महागाई भत्ता) आणि DR (पेन्शनधारकांसाठी महागाई आराम) यांना मूळ पगारात समाविष्ट करावे.
४ ) आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी : आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू व्हावा.अंमलबजावणीत विलंब झाल्यास, फरक रक्कम भरावी.
आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर :- फिटमेंट फॅक्टर हा पगार निर्धारित करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. आठव्या वेतन आयोगात हा घटक २.६ ते २.८६ दरम्यान ठेवल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल.
पेन्शनधारकांसाठी सुविधा :- पेन्शनधारकांसाठी DR मूळ पेन्शनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी.यामुळे पेन्शनधारकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि महागाईचा ताण कमी होईल.
पगार वाढ : फिटमेंट फॅक्टर २.८६ ठेवल्यास, कर्मचाऱ्यांच्या पगारात २५% ते ३०% वाढ होऊ शकते.
पेन्शन वाढ : पेन्शनधारकांसाठी DR मूळ पेन्शनमध्ये समाविष्ट केल्यास, त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.