7th Pay DA Hike : खुशखबर … नवरात्र उत्सव सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार खास ! मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या ‘ या ‘ भत्ता वाढीवर होणार शिक्कामोर्तब !

7th Pay DA Hike : नमस्कार मित्रांनो, केंद्रीय कॅबिनेटची लवकरच बैठक होणार असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे.

आपल्याला माहिती असेल की सध्या 50 % दराने बीए कर्मचाऱ्यांना दिला जात आहे यामध्ये तीन टक्क्याची वाढ होऊन 53 % दराने मागे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.

7th Pay commission DA Hike

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकार वर्षातून दोन वेळेस म्हणजे जुलै आणि जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करत असते.१ जानेवारी नंतर महागाई भत्त्यात वाढ झालेली नसून १ जुलैपासून देय असलेला महागाई भत्ता आता सदरील निर्णयाने मिळणार आहे.

किती वाढणार महागाई भत्ता ?

मागील वेळेस म्हणजे जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करून, 50 टक्के दराने वेतनात समावेश करण्यात आला होता.

यावेळी मात्र महागाई भत्ता 3% ची वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे महागाई निर्देशांकाच्या आधारे सदरील देवा देण्यात येते म्हणजे आता 50% वरून 53% दराने डी ए वाढ होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या विशेष बैठकीत महागाई भत्ता (DA) वाढविण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

हे पण वाचा ~  Bank loan : बापरे.. आपल्याला बॅंकेकडून मिळते तब्बल 10 प्रकारचे लोन! पहा संपूर्ण यादी

महागाई भत्ता वाढ व फरक

सदरील महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून असल्याकारणाने थकीत महागाई भत्ता सुद्धा रोखीने मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थोडक्यात कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर दरम्यानची 3 महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.

महाराष्ट्रात सुद्धा सदरील महागाई भत्ता वाढीचा परिणाम होणार असून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे लगेचच महागाई भत्ता वाढ गिफ्ट मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार केंद्राबरोबरच डीए मध्ये वाढ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!