7th pay commission : नमस्कार मित्रांनो, सातव्या वेतन आयोगानुसार खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना लागू करण्यात येणार असून त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये वाढ होणार आहे. तर काय आहे बातमी आणि कसा होणार फायदा पाहूया सविस्तर
7th pay commission update
महाराष्ट्र राज्य वित्त विभाग, शासन निर्णय दि. २० जुलै, २००५ अन्वये सदरील कालबध्द पदोन्नती योजना बंद करून त्याऐवजी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (एक लाभाची योजना) लागू करण्यात आली आहे.
सरकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासंबंधी शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती,२००८ ने आपल्या अहवालात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतही शिफारस केकेली आहे.
रोहिणी किरवे कक्ष अधिकारी यांच्याकडून महाराष्ट्र शासनशिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल यांना सातव्या वेतन आयोगानुसार कालबध्द पदोन्नती योजनेच्या वेतनश्रेणीबाबत महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.
कालबध्द पदोन्नती योजना
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/वेतनश्रेणी/शिक्षकेतर/टी-४/३८१२, दिनांक १६.०७.२०२४ रोजीच्या संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात आले आहे की, सातव्या वेतन आयोगात पदवीधर ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू झाल्यानंतर, सातव्या आयोगानुसार पदवीधर ग्रंथपाल या पदास एस-१० ऐवजी एस-११ ही वेतनश्रेणी व प्रयोगशाळा सहाय्यक या पदास एस-७ ऐवजी एस-८ ही वेतनश्रेणी अनुज्ञेय करुन त्यांची वेतन निश्चिती करण्यात यावी.
दिनांक ०१.०१.२०१६ पूर्वी कालबाहय पदोन्नती मिळालेल्या एकाकी पदांना दिनांक ०१.०१.२०१६ रोजी वेतननिश्चिती करताना वित्त विभाग शासन निर्णय क्र. वेतन- २०१९/प्र.क्र.२३/सेवा-३, दिनांक ०१.०३.२०१९ मधील तरतुदीप्रमाणे कालबध्द वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.